भारताच्या एका न्यूजमुळं बिघडलं पाकिस्तानचं ‘हवामान’, चीनपर्यंत जाणवतायेत त्याचे ‘परिणाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात, भारताच्या सार्वजनिक प्रसारक डीडी न्यूज आणि ऑल इंडिया रेडिओने हवामानाच्या बातमीनुसार, गिलगिट, मुझफ्फराबाद आणि मीरपूरचे किमान आणि जास्तीत जास्त तापमान सांगितले, पाकिस्तानचे ‘हवामान’ बदलले. पाकिस्तानमध्ये वादळ झाले आणि चीनमध्येही त्याचे परिणाम जाणवले. मुजफ्फराबाद पाकिस्तान व्याप्त काश्मीरची राजधानी आहे आणि मीरपूर या गुलाम काश्मीरचे सर्वात मोठे शहर आहे. जिथपर्यंत गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रश्न आहे, तोदेखील पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग आहे, परंतु प्रशासकीय दृष्टीने पाकिस्तानने याला स्वायत्त प्रदेश म्हणून घोषित केले, ज्यावर नोव्हेंबर १९४७ पासून पाकिस्तानचा कब्जा आहे.

जेव्हा दबाव येतो तेव्हा पाकिस्तान चुका करण्यास सुरवात करते:
जरी अनेक दशकांपासून या भागावर पाकिस्तानचा ताबा आहे, परंतु हे तीन क्षेत्र भारताचा भाग आहेत. पण गेल्या सात दशकांत भारत ज्या प्रकारचे धोरण स्वीकारत आहे, ते कुणापासून लपलेले नाही. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी सरकार काश्मीर आणि पाकिस्तानबद्दल किती आक्रमक आहे, हे जग पाहत आहे. गेल्या वर्षी काश्मीरमधून अनुच्छेद ३७० काढून राज्य दोन भागात विभागण्याच्या भारताच्या निर्णया नंतर भारताने या भागांची हवामानबाबतची माहिती ‘सरकारी’ टीव्ही आणि रेडिओवरून देणे सुरु केले, पाकिस्तानवर दबाव आला. आणि हे पाकिस्तानचे वैशिष्ट्य आहे की, त्यांच्यावर जेव्हा दबाव येतो तेव्हा ते चुका करायला लागतात. या वेळीही तेच घडले.

जेव्हा सोशल मीडियावर लोकांनी पाकिस्तान रेडिओला जोरदार ट्रोल केले:
भारताला उत्तर देण्यासाठी, पाकिस्तानच्या सरकारी प्रसारकांनी रविवारी लडाख, पुलवामा, जम्मूच्या हवामानाचा अंदाज लावायला सुरुवात केली, परंतु पाकिस्तान रेडिओने लडाखचे कमाल तापमान मायनस चार अंश आणि किमान तापमान मायनस एक डिग्री सांगितले, म्हणजे सर्व काही उलट-सुलट. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी पाकिस्तान रेडिओ आणि पाकिस्तानला जोरदार ट्रोल केले. काश्मीरमध्ये असे काय मोठे होणार आहे, असा प्रश्नही लोक उपस्थित करू लागले. त्याला उत्तर म्हणून असे म्हटले गेले की ‘काश्मीरच मोठा होणार आहे.’

यावेळी भारतासह संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे:
ज्यांनी हवामानाच्या परिस्थितीवर काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडेल असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली, त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले की यावेळी भारतासह संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे, मग मोदी सरकार असे पाऊल का उचलेल ज्यामुळे देशाची ताकद विभागली जाईल. मग अचानक दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने मुझफ्फराबाद ते गिलगीट पर्यंत हवामानाची परिस्थिती सांगण्यास सुरवात का केली? वस्तुतः दूरदर्शन पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या हवामानाचा अहवाल गेल्या १५ वर्षांपासून देत आहे. जुन्या रेकॉर्डिंगवर नजर टाकली तर हवामान अँकर अनेकदा चित्रल, गिलगिट आणि मुझफ्फराबाद हवामानचे सांगताना दिसतील, पण असे तेव्हाच व्हायचे जेव्हा संपूर्ण काश्मीरचे हवामान सांगितले जात होते.

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दिला कडक संदेश:
गेल्या काही वर्षांत हवामानाच्या बातम्या बदलल्या आहेत आणि केवळ देशातील शहरांचे तापमान सांगण्यास सुरुवात झाली, ज्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता ते वाराणसी या शहरांचा समावेश होता, पण गिलगिट-मुझफ्फराबाद नाही. पण आता भारतातील बहुतेक शहरांसह मुझफ्फरबाद, मीरपूर आणि गिलगिटचेही तापमान सांगितले जात आहे आणि यामुळेच भारत-पाकिस्तान तापमानात वाढ होत आहे. खरं तर असे करून भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे की, संपूर्ण काश्मीर आमचा आहे आणि भारत या मुद्द्यावर बचावात्मक नव्हे तर आक्रमक रणनीतीवर काम करत आहे.

पीओकेमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे लाँच पॅड सज्ज:
यावेळी भारताला आक्रमक व्हावे लागले, त्यामागे अनेक कारणे आहेत. वस्तुतः सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट आणि कलम ३७० हटवणे यासारख्या पावलांनी पाकिस्तानला जे नुकसान झाले होते, त्यातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पीओकेमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड सज्ज असल्याची माहिती भारताला आहे, चीनचा शह आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या वर्षात अफगाणिस्तानातून बाहेर पडल्याचा फायदा घेऊन पाकिस्तान काश्मीरमध्ये भारताची परिस्थिती अवघड करू इच्छित आहे. सोबतच गिलगिट-बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या तयारीत गुंतले आहेत.

पाकिस्तानला चीनला खूश करण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. चीनचा महत्वाकांक्षी चीन-पाक आर्थिक कॉरिडॉर येथूनच जातो, ज्यावर चीनचे कोट्यवधी कोटींचा रुपये लागले आहेत. भारताने गिलगिट-बाल्टिस्तानला आपला प्रदेश घोषित करून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. चीनला हे समजत आहे की, भारताचा हा विरोध, हा दावा त्यांच्या प्रकल्पासाठी अडचणी निर्माण करू शकतो. म्हणूनच गिलगिट-बाल्टिस्तानला आपला प्रांत घोषित करून पाकिस्तानला त्याची कायदेशीर स्थिती बदलायची आहे.