PAK नं ज्याचं खेळाडूंचं स्वागत केलं, त्यांनी देश विकायला काढला, दानिश कनेरियानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया यांनी एक खुलासा करताना म्हंटले की, पाकिस्तानच्या काही राज्यकर्त्यांनी आणि क्रिकेट बोर्डाने अश्या खेळाडूंना समर्थन दिले , ज्यांनी काही पैशांसाठी पाकिस्तानची विक्री करण्यासारख्या भयंकर गुन्हा केला आहे. परंतु तरीही आज ते संघात असून देशाकडून खेळत आहेत.’ यावेळी कनेरियाने कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेख केला नाही.

तसेच कनेरियाने रविवारी एक यू ट्यूब व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हंटले की, “जे लोक म्हणत आहेत कि, माझ्या चॅनेलला लोकप्रियता मिळवण्यासाठी मी हे सर्व केले आहे. तर त्यांना सांगू इच्छितो, ह्या गोष्टीची सुरुवात मी केलेली नव्हती, तर शोएब अख्तरने याचा नॅशनल टेलिव्हिजनवर याचा उल्लेख केला होता.

तसेच कनेरिया पुढे म्हणाले, ‘लोक म्हणतात की, मी पाकिस्तानसाठी १० वर्षे खेळलो, परंतु मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर खेळलो. बोटावरुन रक्त वाहतानाही मी गोलंदाजी करत राहिलो. येथे काही लोक आहेत ज्यांनी आपला देश विकला आहे आणि आज ते संघात खेळत आहेत. मी पैशासाठी कधीही माझा देश विकला नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने गुरुवारी एका कार्यक्रमात म्हंटले होते कि, पाकिस्तानी संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांना तो संघात नको होता, कारण तो हिंदू आहे, मात्र त्यावर आता अख्तर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले , कनेरियासंदर्भातील त्यांच्या वक्तव्याचे चुकीचा अर्थ काढला जात आहे. अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, त्याने असे कधीच म्हटले नाही की, हिंदू असूनही पाकिस्तानी संघात कनेरियाने गैरवर्तन केले होते. अख्तर म्हणाले की, पाकिस्तानी संघात अशी संस्कृती यापूर्वी कधीही नव्हती आणि विशेषत: धर्माच्या आधारे कोणत्याही खेळाडूशी भेदभाव केलेला नाही.

यानंतर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदीला सामोरे जाणारे कनिरियाने म्हणाले की, असे काही खेळाडू होते ज्यांनी त्याला लक्ष्य केले होते, परंतु धर्मांतर करण्यासाठी त्याच्यावर कधीही दबाव आला नाही. शनिवारी माजी कर्णधार इंजमाम-उल-हक यांनीही सांगितले की कनेरिया त्याच्या नेतृत्वात खेळला आणि यावेळी त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाल्याची त्यांना कल्पना नाही.

कनिरियाने ट्विटरवर लिहिले की, ‘हे खरे आहे की माझ्या कबुलीनंतर मला पाकिस्तान सरकार किंवा बोर्डाकडून कोणतेही सहकार्य मिळालेले नाही, तर माझ्यासारख्याच परिस्थितीतील अन्य खेळाडू पाकिस्तानकडून खेळत आहेत. तेही पीसीबीच्या पाठिंब्याने आणि त्यांनाही आदर दिला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/