PAK : मौलाना म्हणाले – ‘महिला कमी कपडे घातल असल्यामुळं फोफावतोय कोरोना’, PM इमरान खान ऐकतच राहिले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील एका नामांकित मौलाना यांनी कोरोना विषाणूच्या महामारीसाठी महिलांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की ही महामारी मानवतेसाठी धोकादायक बनली आहे कारण महिला अनेक चुकीच्या गोष्टी करत आहेत. हे तर त्याहून आश्चर्यकारक आहे की त्यांनी पंतप्रधान इम्रान यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केले आणि त्यांनी मौलानाला अडवले देखील नाही. ज्या कार्यक्रमात हे मौलाना बोलत होते तो कार्यक्रम टीव्हीवर थेट दाखवला जात होता.

मौलाना म्हणाले जीभ घसरली होती
मौलाना तारिक जमील हे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्या कार्यक्रमात दाखल होते जो निधी उभारणीसाठी आयोजित करण्यात आला होता. अहसास टेलिथॉनच्या निधी उभारणीच्या कार्यक्रमामध्ये तारिक बोलत राहिले आणि इम्रान फक्त त्यांना बघतच राहिले. मौलाना म्हणाले की, कमी कपडे घालणाऱ्या स्त्रियांमुळेच आज कोरोना विषाणूसारखा महामारीचा रोग देशात पसरत आहे. त्यांनी महिलांवर टीका केली आणि म्हणाले की त्यांच्या वागण्यामुळेच देशावर असे संकट येत आहे. जेव्हा या विषयावर बराच वाद झाला त्यानंतर मौलाना जमील यांनी माध्यमांवरच टीका करण्यास सुरवात केली. ते म्हणाले की, त्यांचे वक्तव्य माध्यमांनी अतिशयोक्ती करत दाखवले. यानंतर त्यांनी माध्यमांकडे तर माफी मागितली परंतु महिलांबाबत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली नाही. ते म्हणाले की हे जास्त बोलण्यामुळे तसे झाले होते.

पाकिस्तान मध्ये वाढत आहेत घरगुती हिंसाचाराच्या घटना
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने महिलांविरूद्ध अशा प्रकारच्या वक्तव्याबद्दल मौलानाला चांगलेच सुनावले आहे. आयोगाने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘मौलाना तारिक जमीलने महिलांच्या सन्मानाला कोविड-१९ शी जोडले असून आयोग याबाबत खंत व्यक्त करतो. याप्रकारची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही आणि टीव्हीवर असे सार्वजनिक कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर समाजात चुकीचा संदेश पोहोचतो.’

एका वृत्तसंस्थेने असे वक्तव्य त्रासदायक असल्याचे लिहिले आहे. वृत्तपत्रानुसार, ते टीव्हीवर ऑन एअर असताना त्यांना कोणतेही आव्हानही दिले जात नाही. मौलाना असे आक्रमक वक्तव्य करत राहिले आणि ते थांबवले गेले नाही ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना महामारी नंतर महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.