home page top 1

‘हा’ पाकिस्तानी हिंदू मुलींचा जबरदस्तीने धर्म बदलतोय, नंतर धर्मांतर घडवतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हिंदू नागरिक सध्या दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. येथे राहणाऱ्या हिंदू नागरिकांना दंगा आणि हल्ल्याची भीती सतावत आहे. सिंध प्रांतातील एका हिंदू शिक्षकाला मारहाण करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. त्याचबरोबर एका मंदिरात देखील तोडफोड करण्यात आली आहे. या शिक्षकावर एका विद्यार्थ्याने धार्मिक टिप्पणी केल्याच्या आरोप लावला होता. यानंतर हिंदू धर्मियांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांनंतर आता नागरिकांच्या घरात घुसून त्यांना जबरदस्ती मारहाण करण्यात येत आहे.

हिंदू महिलांचे अपहरण करून धर्मांतर

सिंध प्रांतातील पोलिसांनी या प्रकरणी 218 व्यक्तींच्या विरोधात तीन गुन्हे दाखल केले आहेत. याआधी देखील एका शाळेतील शिक्षकाविरोधात ईश-निंदा प्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार सुरु झाला. दंगल केल्यानंतर या लोकांनी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले देखील केले. यामध्ये धार्मिक नेता मियां मिट्ठू याचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे समर्थक बळजबरी हिंदू महिलांचे अपहरण करून धर्मपरिवर्तन करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

कोण आहे मियां मिट्ठू
1) मियां मिट्ठू याची पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मोठी दहशत आहे. जो व्यक्ती इस्लाम धर्म स्वीकारायला तयार होत नाही त्याचे अपहरण केले जाते.

2) मियां मिट्ठू हा पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे. त्यांचा निशाणा नेहमी हिंदू मुलींवर असतो.

3) मियां मिट्ठू याचे खरे नाव पीर अब्दुल हक आका असे आहे. त्याच्यावर अनेक हिंदू लोकांचे अपहरण आणि बळजबरीने धर्मांतरण केल्याचा आरोप आहे.

4) त्याच्याविरोधात मागील काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील करण्यात आले होते.

Loading...
You might also like