पाकिस्तानात TikTok व्हिडिओ बनविताना गोळीबार; तरुणीसह चौघे ठार

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या कराची शहरातील उच्चभ्रू परिसरात गोळीबार झाला. एका कारमधून TikTok व्हिडिओ काढताना तरुणीसह चार जणांवर गोळी झाडण्यात आली. या गोळीबारात यातील चौघांचाही मृत्यू झाला.

कारमधून हे चौघे जण जात असताना TikTok वर व्हिडिओ शेअर करत होते. नेमकं त्याचदरम्यान काही अज्ञातांनी गोळीबार केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात मृत पावलेल्यांपैकी दोघांची ओळख पटली असून, मुस्कान आणि आमीर असे नाव आहे. इतर दोघे त्याचे मित्र रेहान आणि सज्जाद आहेत. मुस्कानने आमीरला सोमवारी भेटण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर आमीरने कारमध्ये आपल्या दोन मित्रांना घेतले आणि मुस्कानकडे गेले. हे चौघे शहरात फिरत होते आणि TikTok साठी व्हिडिओ बनवत होते. तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली आणि हत्या केली.

तरुणी कारमध्ये तर तीन तरुण कारच्या बाहेर
संबंधित तरुणी कारमध्ये मृत आढळली. तर तीन तरूण कारच्या बाहेर मृत आढळले. ही घटना इत्तिहाद परिसरात घडली.

TikTok वर ऑक्टोबरमध्ये लावली होती बंदी
पाकिस्तानात टिकटॉकवर ऑक्टोबर महिन्यात बंदी घातली होती. मात्र, 9 दिवसांनंतर ही बंदी मागे घेण्यात आली. मात्र, आता याच TikTok व्हिडिओमुळे ही गोळीबाराची घटना घडली आहे.