‘बॉलिवूड आणि हॉलिवूडनेच आमच्या देशाची इमेज आतंकवादी बनवली’ : ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयातने आरोप केला आहे की, बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमाने त्यांच्या देशाची इमेज खराब केली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये प्राईड ऑफ परफॉर्मंस अवॉर्ड मिळवल्यानंतर मेहविशने आपल्या भाषणात हा आरोप केला आहे. हयातला हा पुरस्कार नॉर्वेचे प्रधानमंत्री एर्ना सोल्बर्ग यांनी प्रदान केला आहे.

‘पाकिस्तानला जगात बदनाम केले गेले’
मेहविश म्हणाली की, “समाजाला संदेश देणाऱ्या सशक्त माध्यमांपैकी एक म्हणजे सिनेमा आहे याबाबत माझं दुमत नाही. आमची जबाबदारी मोठी आहे. आम्ही लोकांच्या वर्तणुकीत आणि विचारात परिवर्तन आणू शकतो. परंतु बॉलिवूड आणि हॉलिवूडने मिळून जगात पाकिस्तानची प्रतिमा अशी काही सादर केली आहे की, जो खूप मागास आहे आणि जिथे फक्त आतंकवाद आहे. माझ्या देशाला बदनाम करणाऱ्या काही सिनेमांची नावे मी सांगू शकते. होमलँड, जीरो डार्क थर्टी आणि द ब्रिंक यांसारखे काही सिनेमे सांगता येतील.

‘बॉलिवूडनेही विचार करावा’
मेहविश पुढे म्हणाली की, “बॉलिवूडने मनावर घेतलं असतं तर तो दोन्ही देशातील आपापसातील समज वाढवण्यासाठी सिनेमांचा उपयोग करू शकलं असतं. परंतु त्याने आपल्या ताकदीचा उपयोग देशाला बदनाम करण्यासाठी केला. त्याने आता विचार करायला हवं की काय गरजेचं आहे. फक्त राष्ट्रवाद की, शांतीपूर्ण भविष्य. भारतात सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. तिचं काम लोकांना जोडणं हे असायला हवं. परंतु येथील असंख्य सिनेमे असे आहेत ज्यांनी पाकिस्तान खलनायक असल्याचं सांगितलं आहे. आमचे पीएम इम्रान खान आधीच म्हटले आहे की, भारत जर एक पाऊल पुढे येत असेल तर आम्ही १० पावलं पुढे येऊ.”

आरोग्यविषयक वृत्त –