पाकिस्तीनी अ‍ॅक्टर ‘शान शाहिद’ने उडवली ‘किंग’ शाहरुखची ‘खिल्ली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानने डिजनीच्या द लायन किंग या सिनेमातील भूमिकेला आपला आवाज दिला आहे. याशिवाय शारुखचा मुलगा आर्यननेही यातील एका भूमिकेला आवाज दिला आहे. शाहरुखने याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यानंतर पाकिस्तानी अ‍ॅक्टर शान शाहिदने त्याला रिप्लाय करत त्याची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाला शान शाहिद ?

शाहरुखला रिप्लाय करताना शान शाहिदने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणतो की, “कृपया एका आयकॉनिक सिनेमाला हिंदी डब करून बरबाद करू नका. शाहरुख आणि दुसऱ्या कोणत्या व्हाईस ओवर आर्टीस्टमध्ये काहीच फरक नाहीये. कमीत कमी लायनच्या आवाजाला तरी एक्सप्रेशन बदलायचे होते.”

चाहत्यांनी केले शान शाहिदला ट्रोल

शाहरुख खानची खिल्ली उडवणाऱ्या शान शाहिदच्या ट्विटनंतर चाहत्यांनी शान शाहिदला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी असे म्हटले आहे की, “पहिली गोष्ट हा शाहरुखचा आवाज नाहीये. दुसरी गोष्ट अशी की, तुला कोण म्हटलं आहे की, हिंदी व्हर्जन बघ म्हणून.”

द लायन किंग या सिनेमात शाहरुखने मुफासाच्या भूमिकेसाठी आपला आवाज दिला आहे. तर सिंबा या भूमिकेला शाहरुखचा मुलगा आर्यनने आवाज दिला आहे. सुपरहिट सिनेमा द लायन किंग 19 जुलै रोजी रिलीज केला जाणार आहे. लायन किंगच्या या भागात अ‍ॅनिमेशनचा प्रयोग करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहतेही या सिनेमाची आतुरतेने वाट पहात आहेत.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like