‘ही’ फेमस पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस करतेय बॉलिवूडमध्ये Entry !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील अनेक मोठे सिनेमे हे पाकिस्तानात रिलीज होताना दिसत असतात. याशिवाय पाकमधील अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. या लिस्टमध्ये आता आणखी एका नावाची भर पडताना दिसत आहे.

फेमस पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस (Pakistani Actress) अ‍ॅलिझ नासर (Aleeze Nasser) लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यारावे असं या सिनेमाचं नाव आहे. दुबईत लवकरच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती आहे.

अ‍ॅलिझ पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अ‍ॅक्ट्रेस आहे. मॉडेलिंगमधून (Modeling) तिनं तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 3 वर्ष तिनं मॉडेलिंग केलं. यानंतर तिंन अ‍ॅक्टींग फिल्डमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनयात येण्याआधी तिनं लंडनाल जाऊन अभिनयाचं शिक्षणंही घेतलं आहे. यानंतर तिनं कामाला सुरुवात केली होती.

अ‍ॅलिझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर यलगार आणि वॉर 2 सुपरहिट पाकिस्तानी सिनेमात तिनं काम केलं आहे.

You might also like