पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खानच्या ‘डुप्लीकेट’ची सोशल मीडियावर जोरदार ‘चर्चा’ ! (Photos)

पोलीसनामा ऑनलाइन टीम :  आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक सेलेब्सचे डुप्लीकेट तुम्ही पाहिले असतील. आता पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान दिसणारी एक लाईफ स्टाईल ब्लॉगर चर्चेत आली आहे. कुरासा अन्वर शेख (Kurusah Anwer Sheikh) असं माहिराच्या डुप्लीकटेचं नाव आहे. सध्या कुरासा खूपच चर्चेत आहे.

कुरासानं तिच्या इंस्टावरू अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सचे फिल्मी लुक कॉपी करत फोटो शेअर केले आहेत. काही लुकमध्ये तर तिनं माहिराची स्टाईलही कॉपी केली आहे. कुरासा एक लाईफस्टाईल ब्लॉगर आहे.

कुरासा खूपच सुंदर दिसते. तिला पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल आणि माहिरा खानला पाहतोय की, काय. तिची साईड प्रोफाईल तर हुबेहूब माहिरासोबत जुळते. सध्या कुरासाचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.

माहिराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं पाकमधील अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे. माहिरा खान पाकिस्तानी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नााव आहे. शाहरुख खानच्या रईस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर भारतात पाकच्या कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली.