‘या’ अभिनेत्रीनं केलं ‘प्रपोज’ ! म्हणाली, माझ्या मुलांचा ‘बाप’ होशील का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल तरुण युगल एकमेकांना प्रपोज करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. अनेक भन्नाट आयडिया वापरून दोघे एकमेकांना प्रपोज करत असतात. अनेक निसर्गरम्य ठिकाणी एकमेकांना प्रपोज करतात तर कधी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रपोझ करत असतात. मात्र सोशल मीडियावर सध्या एक ट्विट वेगाने व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीने एका क्रिकेटरला भन्नाट पद्धतीने प्रपोज केले आहे.

पाकिस्तानमधील या अभिनेत्रीने न्यूझीलंडचा क्रिकेटर जिमी निशाम याला प्रपोज करत म्हटले कि, माझ्या मुलांचा बाप होशील का ? ‘सेहर शेनवारी’ असे या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव असून तिने या भन्नाट पद्धतीने त्याला प्रपोज केले आहे. त्यामुळे तिला जगभरातून मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे. भारतातील नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याने ती भडकली आहे.

दरम्यान, तिला भारतीयांनी ट्रोल केल्यानंतर भडकलेल्या शेनवारी हिने भारत हा दहशतवादी देश असल्याचे ट्विट केले होते. त्याचबरोबर जिमी निशाम याला देखील भारतापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –