अमित शहांच्या ‘ट्वीट’वर पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी दिलं ‘हे’ उत्तर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – आयसीसीच्या विश्वचषकाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अन् त्यातील भारताचा पारंपारिक स्पर्धक पाकिस्तानशी सामना ही झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. त्यावरुन अनेकांनी भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला गेला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाला वेगळ्याच पद्धतीने अभिनंदन केले.

अमित शहांनी व्यक्त केलेला आनंद पाकिस्तानच्या सेनेला बहुतेक रुचला नसावा, म्हणून तर पाकिस्तानी सेनेच्या मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महानिदेशक आसिफ गफूर यांनी अमित शाहंच्या ट्विटवर उत्तर दिले आहे.

क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला दिलेली मात आणि दोन्ही देशांत झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची तुलना करु नका असे आवाहन गफूर यांनी केले आहे. टीम इंडीयाने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक केले आणि परिणाम सारखाच निघाला, अशा आशयाचे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. तसेच शानदार खेळासाठी टीम इंडीयाचे कौतूकही त्यांनी केले. यावर गफूर यांनी आपल्या वैयक्तिक अकाऊंटवरून उत्तर दिले आहे.

प्रिय अमित शाहजीतुमच्या टीमने एक मॅच जिंकली. ते चांगले खेळले. दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. त्याप्रमाणे स्ट्राइक आणि मॅचची तुलना केली जाऊ शकत नाही.‘ लं गफूर यांनी म्हटले आहे. तसंच भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचा उल्लेख करत, स्टे सप्राइज्ड असही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/peaceforchange/status/1140557169886208000