भारताच्या विरोधातील PAK ची आणखी एक मोहिम अयशस्वी, मुस्लिम देशांनी दिला झटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताविरोधात पाकिस्तानचे अनेक प्रयत्न विफल ठरत आहेत. संयुक्त राष्ट्रमध्ये इस्लामोफोबियावर इस्लामिक सहकार्य संघटनांच्या (ओआयसी) राजदूतांचा एक अनैपचारिक गट बनवण्याची पाकिस्तानची मोहिम मुस्लिम देशांनी धुडकावली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी इस्लामिक सहकार्य संघटनेच्या व्हर्च्युअल बैठकीत इस्लामोफोबियाचा मुद्दा उचलून धरला आणि एक गट बनवण्याची मागणी केली. परंतु, युएई आणि मालदीवने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला.

ही इस्लामिक सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांची नियमित बैठक होती. पाकिस्तानी राजदुतांनी भारतीय मुसलमान आणि काश्मीरबाबत चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा छळ होत आहे.

पाकिस्तानी प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी बैठकीत म्हटले की, भारतात कोरोना व्हायरसच्या महामारीदरम्यान इस्लामोफोबिया ठळकपणे समोर आला आहे. काश्मीरमध्ये काश्मीरी नसलेल्यांना स्थायिक होऊ देण्याच्या निर्णयावर पाकिस्तानी दूताने म्हटले की, मोदी सरकार तेथील लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

अकरम यांनी अनेक आरोप केल्यानंतरही ते थांबले नाहीत, त्यांनी ओआयसी सदस्य देशांना सावध देखील केले की, त्यांनी भारताला फसू नये. पाकिस्तानी राजदूताने इस्लामोफोबियाला काऊंटर करण्यासाठी ओआयसी देशांचा एक गट बनवा, असे मत मांडले.

यावेळी मालदीवने पाकिस्तानचा उघड विरोध केला. मालदीव मीडियानुसार, मालदीवचे राजदूत थिलमीजा हुसैन यांनी भारताला वेगळे करून निशाणा साधण्यास विरोध केला. ते म्हटले की, दिल्लीवर इस्लामोफोबियाचा आरोप लावणे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. यामुळे दक्षिण आशियातील धार्मिक सलोख्याला नुकसान पोहोचू शकते.

या बैठकीचे अध्यक्ष असलेल्या युएईच्या राजदूतांनीही पाकिस्तानचे म्हणणे फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, इस्लामोफोबियावर अनौपचारिक गटाचा निर्णय सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री घेऊ शकतात.

युएई आणि मालदीवने भारताच्या बाजूने उभे राहात पाकिस्तानची आणखी एक मोहिम अयशस्वी केली आहे. पाकिस्तानच्या राजदूतांनी म्हटले की, ओआयसीमध्ये अशापद्धतीचा गट तयार करणे ही सामान्य बाब आहे. राजदूतांच्या स्तरावरच तो गट गठीत केला जात होता. अशाप्रकारच्या गटाकडून लॉबींग करणे सोपे जात होते. पाकिस्तानच्या राजदुतांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानला इस्लामोफोबियाच्या नावावर गट बनवून भारताला निशाण्यावर घ्यायचे होते.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मंगळवारी यावर एक ट्विट केले आहे. यामध्ये कुरैशी यांनी लिहिले आहे की, पाकिस्तान युएन आणि ओआईसीला इस्लामोफोबिया वाली मोदींच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर टीका करण्यासाठी सतत आवाहन करत आहे. कुरैशी यांनी एका ट्विटमध्ये मोदी यांच्यावर द्रविडीयन सर्वश्रेष्ठता विचारधारा आत्मसात केल्याचा आरोप केला होता, ज्यावरून ते ट्रोल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या ट्विटमधून द्रविडीयन शब्द काढून टाकून तो हिंदुत्व केला.