COVID-19 : ‘या’ 8 पाकिस्तानी सेलेब्सला झाला ‘कोरोना’, सांगितलं कोणती ट्रीटमेंट घेतायेत !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. पाकिस्तानही त्यापैकीच एक आहे. आज आपण त्या पाकिस्तानी कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना कोरोना झाला आहे.

1) अबररा उल हक – दिग्गज पाकिस्तानी सिंगर अबरार उल हक यांनं स्वत:च त्याला कोरोना झाल्याची बातमी दिली होती. 31 मे रोजी त्यानं एक पोस्ट शेअर केली होती. आपलं काम तो स्काईपवरून करत राहिल असंही त्यानं सांगितलं होतं.

2) सकीना सामो – अॅक्ट्रेस सकीना सामो हिला कोरोना झाला होता. या संदर्भात अनेक बातम्या समोर आल्या होत्या. तिच्या निधनाच्याही खोट्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या ज्याचं तिनं खंडन केलं होतं.

https://www.instagram.com/p/B-9XJd3FsJe/

3) आमिर अदनान – पाकिस्तानी डिझायनर आमरि अदनानं यानंही इंस्टा पोस्ट शेअर करत त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

4) माहीन खान – डिझायनर माहीन खाननंही पोस्ट शेअर करत सांगितलं होतं की, तिला 8 जून रोजी कोरोना झाला आहे.

5) रुबीना अशरफ – एक्स पाकिस्तानी अॅक्ट्रेस रुबीना अशरफलाही कोरोना झाला असून ती रिवकवर होत आहे. सध्या ती क्वरांटाईनमध्ये आहे.

6) वसय चौधरी – पाकचा अॅक्टर, स्क्रीन रायटर, प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कॉमेडीयन वसय चौधरी यानंही चाहत्यांना माहिती दिली होती की तो कोरोना पॉझिटीव्ह असून सध्या आयसोलेशनमध्ये आहे.

7) शफात अली – पाकिस्तानी टीव्ही होस्ट कॉमेडीयन शफान अली यानंही कोरोना झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं.

8) नावेद रजा – नावेदला कोरोना झाल्यानंतर तो म्हणाला होता की, कुटुंबावर थोडंही प्रेम असेल तर कोरोना असताना पार्टी करू नका.