भारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील लोक आनंदी आहेत की नाही, हे सांगणे तसे कठीणच आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने जगातील आनंदी देशांबद्दलचा अहवाल सादर केला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी १४० व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत ७ क्रमांकाने मागे गेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी फिनलँड आनंदी देशांच्या यादीत अव्वल राहीला आहे. मात्र भारत पिछाडीवर गेला आहे.

भारत १४० व्या क्रमांकावर असला तरी पण विशेष म्हणजे भारताचा कट्टर विरोधक देश म्हणजे पाकिस्तान या यादीत भारताच्या पुढे आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने बुधवारी यासंदर्भातील अहवाल सादर केला. संयुक्त राष्ट्राने २०१२ पासून २० मार्च हा जागतिक आनंदी दिवस म्हणून घोषित केला आहे. कमाई, जीवनशैली, सामाजिक सहाय्य, आझादी, विश्वास आणि उदारता या अटींवरून ही सूटी ठरवली जाते.

भारतातील आनंदाचे प्रमाण कमी झाले आहे. तसंच जगभरातील आनंदाचे प्रमाणही कमी होत आहे २०१८ मध्ये भारत १३३ व्या स्थानावर होता. मात्र एका वर्षात भारत पिछाडीवर गेला आहे. त्यामुळे देशात क्रोध, उदासी आणि चिंता, अशा नकारात्मक भावना वाढल्या आहेत का ? हा प्रश्न समोर उभा राहतो.

संयुक्त राष्ट्राने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये फिनलॅंड सलग दुसऱ्यांदा आनंदी देशांमध्ये अव्वल ठरला आहे. यानंतर डेन्मार्क, नार्वे, आइसलँड आणि नेदरलँड यांचा नंबर लागतो. तर पाकिस्तान ६७ व्या स्थानी आहे. तर बांग्लादेश आणि चिन अनुक्रमे १२५ आणि ९३ व्या स्थानी आहे. अमेरिका सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. मात्र तरिही अमेरिका या यादीत १९ व्या स्थानावर आहे.

You might also like