नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने फखर जमानच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमधून त्याचे सर्व फोटो हटवले आहेत. इतकेच नाही तर हॅकरने असेही लिहिले आहे की हे इंस्टाग्राम प्रोफाइल विक्रीसाठी आहे.
सेलिब्रिटीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाल्याचे वृत्त आजकाल सतत येत असते. यावेळी पाकिस्तानी सलामीवीर फखर जमान या हॅकर्सचा शिकार झाला आहे. हॅकरने फखर जमानचे इंस्टाग्राम प्रोफाइल हॅक केले आहे. आणि विशेष म्हणजे दोन दिवसानंतरही प्रोफाइल अद्याप हॅकच आहे.
फखर याचे अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याच्या सहकारी खेळाडू शाहीद आफ्रिदीने इंस्टाग्रामला टॅग केले आणि ट्विट केले की पाकिस्तानचा अभिमान आणि क्रिकेटपटू फखर जमान यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. हे एक व्हेरीफाईड खाते आहे.
प्रोफाइलवर फखर जमानचे कोणतेही चित्र दिसत नाही. काही छायाचित्रे स्वतंत्रपणे अपलोड केली गेली आहेत. हे खाते विक्रीसाठी असल्याचे चित्रात कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तथापि, हे खाते आता प्रायव्हेट करण्यात आले आहे त्यामुळे केवळ फॉलो करणाऱ्या लोकांनाच याच्या पोस्ट दिसू शकतील.
इंस्टाग्रामवर फखर जमान यांना 1.71 लाख लोक फॉलो करतात. आतापर्यंत इन्स्टाग्रामवरून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. किंवा या संदर्भात पाकिस्तानी क्रिकेटने कोणतेही विधान केलेले नाही.
फखर जमानच्या आधी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवचे अकाउंट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हॅक करण्यात आले होते आणि त्यात काही आक्षेपार्ह फोटोही अपलोड करण्यात आले होते. यानंतर कुलदीप यादव यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती देताना माफी मागितली होती.
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या