शोएब मलिकनंतर हसन अली बनणार भारताचा ‘जावई’, हरियाणातील ‘या’ मुलीशी ‘प्रेम’

लाहोर : वृत्तसंस्था – भारतीय मुलीच्या प्रेमात अडकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरांच्या यादीत आता हसन अली या पाक क्रिकेटरच्या नावाचा समावेश झाला आहे. शोएब मलिक प्रमाणे हसन अली देखील लवकरच भारतीय मुलीसोबत विवाह बंधनात अडकेल. पाकिस्तानचेउर्दू वर्तमानपत्र एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अली हरियाणातील एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या लग्नाची तयारी करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना संपर्क साधत आहेत. मुलीकडून होकार आल्यास ऑगस्टच्या तिसऱ्या महिन्यात हे लग्न होऊ शकते. वृत्तानुसार २० ऑगस्टला लग्न होणार आहे. लग्नासाठी मुलीच्या कुटुंबातील १० लोक १७ ऑगस्टला दुबईला रवाना होण्याची शक्यता आहे.

मुलगी भारतीय एअरलाईनमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. हसन अलीने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे त्याने म्हंटले की, चर्चा चालू आहे पण अजून काही निश्चित झालेले नाही. या आधी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने भारतीय टेनिस पट्टू सानिया मिर्जा सोबत लग्न केले आहे. प्रसिद्ध फलंदाज मोहसीन खान यांनी देखील अभिनेत्री रीना रॉय यांच्यासोबत लग्न केले होते, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like