धक्‍कादायक ! पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम उल हकचे ७ तरुणींबरोबर ‘अफेयर’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याचा भाचा आणि युवा क्रिकेटपटू इमाम उल हक याचे अनेक तरुणींबरोबर अफेयर असल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.

imam-ul-haq s leaked whatsapp chat

एका ट्विटर युजरने इमाम उल हक याच्या व्हाटसअपवरील चॉट लिक केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात व्हाटसअप चॉटमध्ये या तरुणी इमाम उल हकने आपले शोषण केल्याचे सांगत आहे. लिक झालेल्या या व्हाटसअप चॉटमधून तो किमान ७ ते ८ तरुणींबरोबर डेट करीत होता हे दिसून येत आहे. या तरुणींच्या चॉटमध्ये तो सर्वांना आपण अविवाहित असल्याचे सांगत होता.

डाव्या हाताचा फलंदाज असलेला इमाम उल हक हा इंग्लडमधील वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान टीमचा सलामीचा फलंदाज होता. वर्ल्ड कपमधील शेवटच्या बांगला देशाविरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करुन पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –