पाक डायरेक्टरनं LIVE शोमध्ये केली महिलेला ‘शिवीगाळ’, माहिरा खाननं घेतला ‘समाचार’

पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानी रायटर आणि डायरेक्टर खलील उर रहमान वादात सापडला आहे. त्यानं लाईव शोमध्ये पेनालिस्ट मारवी सिरमेड (Marvi Sirmed)ला अपशब्द वापरले आहेत. यानंतर त्याच्यावर आता टीका होताना दिसत आहे. अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान हिनं त्याचा समाचार घेतला आहे.

माहिरानं या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये माहिरा म्हणते, “मी आता जे काही पाहिलं आणि ऐकलं त्यामुळं मला धक्का बसला. हा तोच माणूस आहे ज्यानं एका महिलेला शिवी दिली होती आणि त्यालाच एकामागोमाग एक प्रोजेक्ट मिळत आहेत. कोणत्या कारणामुळं? जर आपण अशी विचारसरणी नष्ट करू शकत नसू तर आपणही तितकेच दोषी आहोत.”

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये माहिरा म्हणते, “मला असं वाटतं की, जे लोक आपल्या अधिकारासाठी उभं राहण्याच्या विचारासोबत उभे आहेत त्यांनी स्पष्टपणे बोलायला आणि लिहायला हवं.”

काय म्हणाला खलील ?

खलील व्हिडीओत मेरा जिस्म मेरी मर्जी यांसारख्या घोषणाबाजीवर न्यायालयच्या निर्णयावर काही बोलत होता. एवढ्यात मारवी काही तरी म्हणते. यानंतर खलीलच्या रागाच्या पारा चढतो आणि तो म्हणतो, मध्ये बोलू नका. दोघांमध्ये वाद सुरू होतो. खलील मारवीसोबत बोलताना अपशब्द वापरतो.