‘परेशान’ पाकिस्तान सरफराजच्या टीममुळे झाला आणखीनच उदास, फॅन्स म्हणाले, क्रिकेट सोडा कुस्ती खेळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवून धूवा उडवून दिल्याने पाकिस्तानचे क्रिकेट प्रेमी अत्यंत रागात आहे. सोशल मिडियावर एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानची टीम नीट न खेळल्याने तो पाकिस्तानी खेळाडूंवर टीका करत आहे. यावेळी या चाहत्यांचा राग अनावर झाला आणि त्याने पाकिस्तानी क्रिकेटरला क्रिकेट सोडून दंगल (कुस्ती खेळा) करा अशी सूचना केली आहे.

‘पिज्जा आणि बर्गर’मुळे पाकिस्तान हरला –

पाकिस्तानी चाहत्याचा तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंंतर एक यूजरने लिहले आहे की, पाकिस्तानी चाहत्याला याचे दुख आहे की त्यांना महागाईमुळे टॉमॅटो खायला मिळत नाही आणि त्यांची टीम मॅचच्या आधी रात्री बर्गर आणि पिज्जा खात असते.

लोकांच्या आनंदावर पाणी फेरले –

व्हिडिओत त्या चाहत्याने सांगितले की पाकिस्तानात महागाईने बेहाल झालेल्या लोकांना खूष करण्यासाठी एक संधी आली होती, परंतू पाकिस्तानी क्रिकेटरने ती संधीपण त्यांच्यापासून हीरावून घेतली. त्या क्रिकेट चाहत्याने असे देखील सांगितले की, लोक पाकिस्तानी क्रिकेटर्सकडून आशा बाळगून होते, त्यासाठी आपले पैसे आणि वेळ लोक त्यामध्ये वाया घालवतात. परंतू पाकिस्तानी क्रिकेटरला याची जाणीव नाही की पाकिस्तानातील परिस्थिती काय आहे. पाकिस्तानी क्रिकेटर ईमानदार असते तर त्यांना कळाले असते की किती खायचे आहे आणि किती व्यायाम करायचा आहे.

सध्या सोशल मिडियावर पाकिस्तानी चाहत्यांचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. त्यात पाकिस्तानचा कॅप्टन बराच ट्रोल होताना दिसत आहे.

सिनेजगत

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’