पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’च्या CEO वर सिनेमाच्या डायरेक्टरनं लावला ‘रेप’चा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांने डॉन या वृत्तपत्राचे सीईओवर बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. दिग्दर्शक जमशेद महमूद यांनी सांगितले की डॉनचे सीईओ हामिद हारुन यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये जमशेद यांनी हारुन यांचे नाव न घेता एका मीडिया मालकाने त्यांच्यावर 13 वर्षांपूर्वी बलात्कार केला होता.

ट्विटरवर एक नवे अकाऊंट तयार करुन जमशेदने डॉन वृत्तपत्राच्या सीईओवर बलात्काराचा आरोप लावला आहे. त्यांनी सांगितले की त्यांचे जुने अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी नवे अकाऊंट सुरु करुन त्यावरुन घटनेची माहिती दिली.

जमशेद महमूद जॅमी नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना शनिवारी रात्री हारुन यांच्यावर आरोप करत अनेक ट्विट केले, त्यांनी फेसबूक पेजवर देखील आपले ट्विट शेअर केले आहेत. तर हारुन यांनी सोमवारी हे आरोप फेटाळून लावले. हारुन यांच्याकडून सांगण्यात आले की हे सत्य नाही. हे माहिती त्या लोकांना तयार केली आहे जे मला आणि वृत्तपत्राला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हारुन यांनी या आरोपांवरुन कायदेशीर करावाईचा करण्यात येईल असा इशारा दिला.

ज्यानंतर जमशेद यांनी हारुन यांच्या विधानावर पलटवार केला. जमशेद यांनी ट्विट करत सांगितले की त्यांना भीती होती की त्यांच्यावर आरोपी केले जातील की ते डॉन वृत्तपत्राला बदनाम करण्यासाठी असे करत आहेत. ते म्हणाले की हे प्रकरण डॉन वृत्तपत्राविरोधात नाही, तर खासगी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा