पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी ‘पीर बाबा’ बनून कापले महिलांचे केस, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान असो वा परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे त्यांच्या वादग्रस्त विधान आणि कृतीबद्दल सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. या वेळी परराष्ट्रमंत्री त्यांच्या एका विचित्र कृत्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कुरेशी यांनी ‘पीर बाबा’ बनून मुलतानमधील आपल्या घरी महिलांचे केस कापले आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून सोने, चांदी आणि रुपये घेतले. कुरेशीचा महिलांचे केस कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही वापरकर्ते त्याची चेष्टा करत आहेत, तर काही जण त्याच्या वागण्यावर टीका करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये कुरेशी महिला आणि मुलींचे केस कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, महिलांना कुरेशीशी निष्ठा दर्शविण्यास भाग पाडले जात आहे आणि दबावात केस कापत आहेत. इतकेच नाही तर त्याना मजबुरीमध्ये कुरेशीला पैसे आणि सोनेदेखील द्यावे लागले. धर्माच्या नावाखाली महिलांची होणारी लूट ही संपूर्ण पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. पीर बाबा असल्याचे भासवल्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यावर कडक टीका केली जात आहे.

पाकिस्तानी मीडिया अहवालात सांगितले गेले आहे कि, परराष्ट्र मंत्री गेल्या अनेक दशके मुलतान मध्ये पीर मुरीडी प्रणाली चालवत आहेत. त्यांनी मुल्तानमधील लोकांसाठी भक्तीची शपथ घेतली असून स्वत: ला पीर म्हटले आहे. असे मानले जाते कि, महिलांचे केस कापल्याने जुन्या गुन्ह्यांचे प्रायश्चित्त होते. एकदा असे झाल्यास शपथ घेतलेल्या व्यक्तीस मुरीद म्हंटले जाते. उर्सच्या निमित्ताने शाह तरुण मुली आणि स्त्रियांना आपल्या पार्टीत सहभागी करण्यासाठी त्यांना निष्ठेची शपथ देतात.