73 वर्षानंतरही नाही मिळाले पाकिस्तानला स्वातंत्र्य, PAK च्या पत्रकाराचा दावा

इस्लामाबाद : पत्रकार मारवी यांनी म्हटले, पाकिस्तान 73 वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे, कारण खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि अन्य क्षेत्रातील लोकांना स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नाही. त्यांनी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस, जो 14 ऑगस्टला साजरा केला जातो, म्हटले की, पाकिस्तान स्वातंत्र्याची 73 वर्षांना दर्शवतो, परंतु अजूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, मीडिया, संसद, अ‍ॅक्टिविस्ट, 1000 बेपत्ता लोक, …कुणीही स्वतंत्र नाहीत. जन्मदिनाच्या शुभेच्छा पाकिस्तान!

पाकिस्तान येथे राहात असलेले अल्पसंख्यांक जसे की शिया, अहमदी, हिंदु, शिख आणि ईसाई यांच्यासोबत अतिशय वाईट वागतो. पंतप्रधान इम्रान खान यांनी 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीर मुद्द उपस्थित करण्यापूर्वी काही तास अगोदर, अहमदी अल्पसंख्यांक समाजाच्या एका ज्येष्ठाला पेशावरमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते.

अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक जसे की, बलूच, पश्तून, महाजिर, काश्मीरी, बाल्टिस, ईसाई आणि हिंदू हे पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघांकडून छळ सहन करत आहेत. शुक्रवारी व्हॉईस फॉर सिंधी मिसिंग पर्सन्स आणि अन्य मानवाधिकार संघटनांनी सिंधमध्ये बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबासोबत एकजुटता व्यक्त करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आणि या दरम्यान घोषणा दिल्या, ये जो देहशदगर्दी है, इसके पीछे वर्दी है. म्हणजे ते स्पष्ट म्हणत आहे की, या दहशतवादी कारवायांपाठीमागे वर्दीतील जवान सहभागी आहेत, त्यांचा इशारा पाकिस्तानी लष्कराकडे आहे.

पाकिस्तान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापार केला, यावेळी बेपत्ता व्यक्तींचे कुटुंबिय आणि मानवाधिकार कार्यकर्ते, कराची प्रेस क्लबच्या बाहेर होते.