या ‘शौकीन’ पाकिस्तानी नागरिकाने चक्‍क वाघ पाळलाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण पाळीव प्राणी म्हणून मांजर, कुत्रा, पोपट अशा प्रकारचे प्राणी पाळलेले नेहमी बघत असतो. मात्र पाळीव प्राणी म्हणून कुणी वाघ पाळल्याचे आजपर्यंत पहिले नसेल. पाकिस्तानमध्ये मात्र एक इसम असा आहे ज्याने पाळीव प्राणी म्हणून चक्क वाघ पाळला आहे. पाकिस्तानातील मुल्तानमध्ये राहणाऱ्या जुल्कैफ चौधरी यांनी आपल्या घरात या वाघाला पाळले आहे.

या वाघाला राहण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र रूम बनवली आहे. त्यात बेड, एसी यांसारख्या सगळ्या सोयीसुविधा पुरवण्यात आला असून त्याचा महिन्याचा खरच हा दोन लाख रुपये असल्याचे चौधरी यांनी सांगितले. संबंधित विभागाकडून यासाठी परवानगी घेऊन त्यांनी त्या वाघाला तीन लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. या वाघाला त्यांनी आपल्या घरातच ठेवले असून त्यांचा दोन वर्षांचा मुलगा देखील त्याच्याबरोबर खेळत असतो.

त्यांनी या वाघाला खरेदी केले तेव्हा ते दोन महिन्यांचे पिल्लू होते. आता तो वाघ आठ महिन्यांचा झाला असून त्यांनी त्याचे नाव ‘बब्बर’ असे ठेवले आहे. वाघाविषयी बोलताना ते म्हणाले की, घरी वाघ आल्याने माझा सन्मान वाढला आहे. वाघाबरोबर सेल्फी घेण्यासाठी घरी दररोज हजारो लोकं येतात. त्याचबरोबर आम्ही त्याला पाळीव प्राण्यासारखेच ठेवणार असून मला अगोदरपासूनच वाघांची आवड असल्याने मी वाघ पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील ते म्हणाले.

आरोग्य विषयक वृत्त-
त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन
स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ
फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

Loading...
You might also like