पाकिस्तानमधील ‘मशिदी’मध्ये प्रवेश करताना तुडवले जातात ‘अमेरिका’ आणि ‘इस्रायल’चे राष्ट्रध्वज (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवाद आणि कलम 370 च्या मुद्द्यावर जगभरात भारताच्या राजनैतिक यशानंतर पाकिस्तान आता तिरस्कारजनक कृतीत उतरला आहे. वास्तविक, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान प्रत्येक ठिकाणी या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची विनवणी करीत आहे. परंतु कोणताही देश पाठिंबा देण्यास तयार नाही. अमेरिकेकडूनही पाकिस्तानला वारंवार ठेंगाच दाखवला जातोय. त्यामुळे संतप्त होणारे पाकिस्तानचे नागरिक आता अमेरिका आणि इस्त्राईलविरूद्ध संताप व्यक्त करीत आहेत.

याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये पाकिस्तानमधील मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ अमेरिका आणि इस्रायलच्या राष्ट्रीय ध्वजांचे मॅट पडलेले आहेत, ज्यांना पायांनी तुडविले जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर डेव्हिड व्हान्स नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे – पाकिस्तानी मुस्लिम अमेरिका आणि इस्त्राईलच्या झेंड्यावर पाऊल टाकून मशिदीत प्रवेश करत आहेत. यांच्यात आदराची कमतरता आहे. या देशाला कोणतेही परदेशी मदत का मिळते ?

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून लोक पाकिस्तानच्या अडाणीपणाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like