पाकिस्तानच्या खेळाडूचा ताबा सुटला ; मैदानावरच दिल्या शिव्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे क्रिकेटपटू नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडत असतात. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदवर अपशब्द वपारल्याप्रकरणी आयसीसीने कारवाई करून थोडेच दिवस झाले होते. तर त्यावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर झमानने मैदानात शिवी दिल्याचं चित्र समोर आलं आहे.

सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्या दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात अहमदने फेलुक्वायोवर वर्णद्वेषी टीका केली होती. आता त्याच मालिकेच्या ५ व्या सामन्यात फखर आणि बाबर आझम हे दोघे फलंदाजी करत होते. त्यावेळी पाकिस्तानची 1 बाद 60 अशी अवस्था होती. त्यावेळी कागिसो रबाडाच्या चेंडूवर फखर फसला. रबाडाचा चेंडू वेगाने येईल, असे वाटत होते. पण चेंडू संथपणे आला आणि फखरच्या खांद्याला लागला. त्यानंतर फखरने अपशब्दाचा प्रयोग केला.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांवर माघारी परतले होते. युवा गोलंदाज शाहीद आफ्रीदीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पण, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यावेळी सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने टीप्पणी केली.

अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?), अशी टीका सर्फराजने उर्दुत केली. त्यामुळे ते कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड आहे, असं सांगितलं. परंतू आयसीसीने याप्रकरणी लक्ष घातले. आयसीसीने अहमदवर चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता आयसीसी फखरवर काय कारवाई करलं हे पाहणं महत्त्वाचे असेल.