Video : पाकिस्तानींच्या ‘या’ व्हिडीओमुळं ‘इमरान’ची संपुर्ण जगासमोर ‘नाच्चकी’, खाली घालावी लागली मान, जाणून घ्या प्रकरण

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –   पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी देशात सर्वात मोठ्या वृक्षारोपण उपक्रमाला सुरूवात केली. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक झाडे उपटून फेकत आहेत आणि त्याचा संबंध इस्लामशी जोडत आहेत.

पर्यावरणवादी एरिक सोलहेम यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेयर करत लिहिले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण उपक्रम राबवला. मात्र, काही कट्टरपंथीयांनी इम्रान खान यांच्या या प्रयत्नांवर पाणी फिरवले आहे. या कट्टरपंथीयांनी हा उपक्रम इस्लामच्या विरूद्ध असल्याचे म्हटले आहे. वेडेपणाची पण हद्द! सर्व धर्म निसर्गाचे रक्षण करण्यास सांगतात.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाकिस्तानच्या खैबर मंडी खास जिल्ह्यातील आहे. व्हिडिओमध्ये लोक गर्दीकरून झाडे उपटताना दिसत आहेत.

पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीनुसार, काही लोक यासाठी सुद्धा सरकारचा विरोध करत होते, कारण जागेच्या मालकी हक्कावरून वाद होता.

समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, प्रशासनाकडून लावण्यात आलेली सुमारे 6000 रोपे या लोकांनी उपटून फेकून दिली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी प्रकरणाची देखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यापक स्तरावर वृक्षारोपण मोहिम सुरू केली होती. ही मोहिम सुरू झाल्यानंतर एका दिवसात 35 लाख झाडे लावण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी इम्रान खान यांनी म्हटले की, पाकिस्तान जलवायु प्रदुषणाने वाईट प्रकारे प्रभावित 10 देशांमध्ये आहे. आम्ही आज 35 लाख झाडे लावली आहेत, ही एक सुरूवात आहे. हे एक सुरूच राहणारे युद्ध आहे. या युद्धात आपण आपल्यासाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी सर्वकाही करत आहोत.