पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी ! इम्रान खान यांनी काश्मीराची सोडली ‘आशा’, म्हणाले – ‘मोदी असेपर्यंत अशक्य’

लाहोर : वृत्त संस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघण्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. पाकिस्तानी पीएम इम्रान यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, भारतात मोदी सरकार असेपर्यंत काश्मीर समस्येबाबत कोणतीही आशा नाही.

इम्रान खान म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीरवर कोणताही तोडगा निघू शकणार नाही, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकार नाझी आणि हिटलरच्या विचारधारेचे अनुसरण करत आहे.

बेल्झियमच्या व्हीआरटी टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इम्रान खान यांनी म्हटले की, मला या सरकारकडून काही आशा वाटत नाही, परंतु भविष्यात एक मजबूत भारतीय नेतृत्व काश्मीर समस्येवर योग्य तोडगा जरूर काढू शकते. भारतीय नेते जवाहर लाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काश्मीरी नागरिकांना स्वनिर्णयाच्या अधिकाराचे वचन दिले होते, परंतु अजूनपर्यंत भारत त्यांना ते अधिकार देत नाही. कारण त्यांना माहित आहे की, जर काश्मीरींना हे अधिकार दिले तर ते पाकिस्तानची निवड करतील. काश्मीर मुस्लीम बहुसंख्यांक क्षेत्र आहे.

ते म्हणाले, मला वाटते की, जर भारतात मजबूत आणि स्पष्ट विचारांचे नेतृत्व सत्तेत आले तर या समस्येवर तोडगा निघू शकतो.

पाकच्या पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, सध्या भारतात असलेल्या सरकारची आरएसएसची कट्टर विचारधारा आहे, जी नाझींशी प्रेरित आहे. सध्या भारतातील सरकार आरएसएस चालवत आहे, जी हिटलरच्या वंशवादी विचारसरणीवर विश्वास ठेवते. याच कारणामुळे त्यांनी करोडो काश्मीरी नागरिकांना एका खुल्या कारागृहात बंद केले आहे.

अफगानिस्तानमधील शांततेच्या चर्चेबाबत इम्रान खान म्हणाले की, ते अमेरिका आणि तालिबानमध्ये संभाव्य समझोत्याबाबत आशादायी आहेत. इम्रान म्हणाले, प्रथमच सर्व गोष्टी योग्य दिशेने जात आहेत, अमेरिकन तालिबानसोबत शांततेसाठी चर्चा करू इच्छितात आणि तालिबान अमेरिकेसोबत चर्चा करू इच्छितात. यानंतर शस्त्रसंधीबाबत पाऊल उचलण्यात येईल आणि नंतर पुढील टप्प्यात तालिबान अफगाण सरकार सोबत चर्चा करेल.

इम्रान खान म्हणाले, जेव्हा पासून आमचे सरकार सत्तेत आले आहे, अफगानिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. त्यांनी हे देखील म्हटले की, अफगानिस्ताणमध्ये 19 वर्षांच्या मोठ्या संघर्षामुळे सर्वकाही एवढे सोपे नाही. मी यासाठी आनंदी आहे की, पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून माझ्या कार्यकाळातील पहिले वर्ष 9/11 च्या हल्ल्यानंतर सर्वात सुरक्षित वर्ष ठरले.