पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दाखवले ’अमिष’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – असे वाटत आहे की, भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर जमलेला बर्फ विरघळू लागला आहे. पाकिस्तानकडून सुद्धा असा प्रयत्न होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये नाते तणावपूर्ण झाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिली अट ही ठेवत होते की, जोपर्यंत भारत काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा लागू करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. परंतु, आता असे वाटत आहे की, पाकिस्तान ही अट सोडून चर्चा सुरू करण्यास तयार आहे.

पाकिस्तान अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहे आणि भारतासोबत तणाव हे संकट आणखी गुंतागुंतीचे बनवत आहे. पाकिस्तानला सुद्धा ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहित आहे. तेव्हाच इम्रान खान भारताला अमिष दाखवत आहेत की, जर तणाव कमी झाला तर सर्व भागाला फायदा होईल. इम्रान खान यांचे अलिकडचे वक्तव्य भारताच्या रणनितीच्या विजयाप्रमाणे आहे कारण आता पाकिस्तान मोठ्या कालवधीपर्यंत कलम 370 रद्द करण्याबाबत नाकारू शकत नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले की जर काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला तर सर्व भागाला त्याचा फायदा होईल. इम्रान खान यांचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे जेव्हा दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषेवर युद्धविरामावर सहमती झाली आहे. यासोबतच पुढील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये सिंधु जल करारावर सुद्धा चर्चा होणार आहे. तर, 30 मार्चला तजाकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये अफगाणिस्तानवर एक प्रादेशिक कॉन्फरन्समध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री एकत्र येणार आहेत.

बुधवारी इम्रान खान यांनी इस्लामाबाद सुरक्षा संवादात म्हटले, हे अतिशय दुर्दैवी आहे की, आम्ही सभ्य शेजार्‍याप्रमाणे भारताशी चर्चेद्वारे प्रकरणे सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु याचा उपयोग होत नाही. आमच्यात केवळ काश्मीर मुद्दा आहे. भारताने कलम 370 रद्द करून दोन्ही देशांना शांततेच्या मार्गावरून बाजूला केले. यानंतर आम्हाला सुद्धा अनेक पावले मागे घ्यावी लागली.

इम्रान खान म्हणाले, काश्मीर मुद्दा सुटला तर भारताला सुद्धा मध्य आशियामध्ये व्यापारासाठी व्यापक संधी मिळेल. काश्मीर मुद्द्यामुळे सर्वकाही थांबलेले आहे. मी सर्व प्रयत्न केले परंतु भारताने कोणती रूची दाखवली नाही.

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरून वाटते की, दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी व्यवस्था केली जात आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी सुद्धा पाकिस्तानसोबत चर्चेसंदर्भात सकारात्मक वक्तव्य केले होते.

हर्ष श्रृंगला म्हणाले, भारताला आपला शेजारी पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर द्विपक्षीय आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यास इच्छूक आहोत. आम्ही रचनात्मक वातावरणात कोणत्याही चांगल्या चर्चेसाठी तयार आहोत. हर्ष श्रृंगला यांनी हे वक्तव्य त्या अटीसह केले नाही जी भारत नेहमी मांडत आला आहे. भारताची अट होती की, पाकिस्तानने प्रायोजित दहशतवाद थांबवावा तरच चर्चा होईल.

25 फेब्रुवारीला दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती. दोन्ही देशांमध्ये 2015 नंतर औपचारिक चर्चा झालेली नाही. 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी व्यापक द्विपक्षीय मॅकेनिझम बनवण्याची घोषणा केली होती.