काश्मीरमध्ये मुस्लीमांवर अत्याचार होत आहेत म्हणून ‘गप्प’, इम्रान खानचा UN वर ‘गंभीर’ आरोप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचे हतबल झालेले पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री एकामागून एक द्वेषपूर्ण विधाने करत आहेत. आज देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी शुक्रवारी इस्लामिक कार्डचा मुद्दा उकरून काढला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे इम्रान म्हणाले. काश्मिरी नागरिक मुस्लिम असल्यानेच संयुक्त राष्ट्र गप्प आहे असा गळा त्यांनी काढला.

पीओकेमध्येही भारत बालाकोटसारखे काहीतरी करू शकतो :
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायावर आरोप केला की जर काश्मीरमध्ये मुस्लिम नसते तर संपूर्ण जगाने याविरोधात आवाज उठवला असता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्र संघ मुसलमानांवरील अत्याचाराच्या ठिकाणी शांत बसतात. इतकेच नव्हे तर एकदा बालाकोटमध्ये भारतीय सैन्याच्या कोणत्याही कारवाईला नकार देणारे इम्रान खान आज मात्र म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारत बालाकोटसारखे काहीतरी करू शकतो.

RSS वरही काढला राग :
कश्मीर मुद्द्यावर हतबल झालेल्या इम्रान खान यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावरही (RSS) राग काढला. आरडाओरड करतांना सांगितले की आपल्याला त्यांची विचारसरणी समजून घ्यावी लागेल. हा द्वेषमूलक भावनेतून जन्मलेला एक गट असून हिंदू त्याला आदर्श आणि उत्तम मानतात. आरएसएसला भारतातील मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून ठेवण्याची इच्छा आहे. काश्मीरमध्ये काय घडत आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. एकीकडे इम्रानने संयुक्त राष्ट्रावर संताप व्यक्त केला आणि दुसरीकडे त्यांनी असेही म्हटले की ते पुन्हा जागतिक संघटनेच्या वार्षिक बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतील.

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थित करणार :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, संयुक्त राष्ट्र महासभेतही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा मुद्दा मी उपस्थित करीन. ते म्हणाले की मी युरोपमधील नेते, ट्रम्प आणि इस्लामिक देशांचे नेते यांना काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दल सांगितले आहे. जर जग आज सामान्य काश्मिरींसाठी उभे राहिले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.

आरोग्यविषयक वृत्त –