भारतीय जाहिरातींवर ‘बॅन’, पाकिस्तानच्या सरकारचा ‘फतवा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान सरकारकडून भारताबाबत व्देष व्यक्त केला जात आहे. समझोता एक्सप्रेस आणि लाहोर-दिल्ली बससेवा पाककडून रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडून पाकिस्तानने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. एवढावरच न थांबता पाकिस्तानी सरकारने आता एक फतवा काढला असून भारतीय जाहिराती दाखविण्यास पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडियाला बंदी घलण्यात आली आहे.

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (pemra) भारताकडून निर्माण करण्यात आलेल्या तसेच भारतीय कलाकार असलेल्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. याबाबत पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने एक परिपत्रक काढलं आहे. टीव्हीवर भारतीय कलाकारांना पाहून पाकिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत असे त्या पत्रकामध्ये नमुद करण्यात आलं आहे. सनसिल्क शॉपू, डेटॉल साबण, सर्फ एक्सेलसह इतर काही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी पाकिस्तानने बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात भारतीय सिनेमे आणि जाहिरातींवर बॅन आणला होता.

आरोग्यविषयक वृत्त –