पाकिस्तानी नागरिकांना खाण्याचे देखील ‘वांदे’, PM इम्रान खान झाले ‘बेबस’ !

इलाहाबाद : वृत्तसंस्था – सध्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस अधिकच खालावत आहे. त्यामुळे तेथील महागाई दिवसेंदिवस गगणाला भिडत आहे. या वाढणाऱ्या महागाईचा आणि होणाऱ्या बदलांचा सर्व परिणाम पाकिस्तानच्या सामान्य लोकांवर होत आहे. त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमध्ये यंदा गव्हाचे उत्पादन मागील वर्षापेक्षा ३३ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर पाकिस्तानमध्ये दिवाळखोरी अधिक वाढली आहे. त्यामुळे १०-१२ रुपयात मिळणारी एक चपाती आता २०-३० रुपयांना मिळत आहे. तेथील लोकांना या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती अधिक हालाकीची न होता आटोक्यात आणण्यासाठी इम्रान खान यांनी सध्यातरी गहू आणि पीठ एक्सपोर्ट करण्यावर बंदी घातली आहे.

गहू आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी इम्रान खान यांनी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक को-ऑर्डिनेशन कमिटीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच आता कब्रेवरही टॅक्स लावण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या सरकारने मृतांना दफन करण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या कब्रस्तानांवर टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. एका कब्रेवर १ ते दीड हजार पाकिस्तानी रुपये वसूल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावात सांगण्यात आले आहे की या टॅक्समधून येणारे पैसे कब्रस्तानाची देखरेख करण्यासाठी वापरले जातील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like