पाकिस्तानी सिंगर रबी पीरजादाची पुन्हा ‘नौटंकी’,बनली ‘आत्मघातकी’, PM मोदींवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या कृत्यातून सतत भारताविरोधात गरळ ओकणारी पाकिस्तानी पॉप गायिका रबी पीरजादा पुन्हा एकदा नवा ड्रामा घेऊन सोशल मीडियावर आली आहे. रबी पीरजादा आपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे पाकिस्तानात सतत चर्चेत असते. यावेळी तीने एखादा बॉम्ब लावल्याप्रमाणे जॅकेट घातले आहे. यामध्ये ती भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत धमकी देताना दिसत आहे.

रबी पीरजादाने टाकलेल्या फोटोमुळे भारतात तिची निंदा केली जात आहे. लोकांनी तिच्या फोटोवर अनेक कमेंट दिल्या आहेत. त्यातील एक जण म्हणतो कदाचित ही कराचीमध्ये होणाऱ्या फॅशनसाठी तयारी करत आहे. तर एकाने लिहिले आहे दिवाळी आली आहे चुकून फुटून जाशील.

भारतावर सापांच्या साहाय्याने हल्ला करण्याची दिली होती धमकी
रबी पीरजादा ने ट्विटवरून एक व्हिडीओ टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर साप, मगर असे प्राणी सोडून हल्ला करण्याची धमकी दिली होती. रबी पीरजादा गाणी कमी म्हणते आणि नौटंकी जास्त करत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. जेव्हा हा व्हिडीओ नीट पाहिला गेला तेव्हा समजले की तिने दाखवलेले साप आणि मगर हे खेळण्यातील असल्याचे दिसून आले

या व्हिडीओ सोबत या गायिकेने हे देखील लिहिले आहे की आम्ही काश्मीरमधील एका मुलीला भारताविरोधात तयार करत आहोत.

कलम 370 हटवल्याचा बदला
भारत सरकारने कलम 370 रद्द केल्यामुळे याचा बदल घेणार असल्याचे देखील पीरजादा हीने सांगितले. यासाठी ती काश्मीरच्या मुलींना तयार करत असल्याचे सांगते.रबी पीरजादाने पॉप सिंगिंग व्यतिरिक्त अनेक मालिकांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. काश्मीरबाबतच्या आपल्या विवादास्पद वक्तव्यांमुळे रबी पीरजादा नेहमी चर्चेत असते. रबी पीरजादा 2017 मध्ये सलमान खान आणि बॉलीवूड विश्वाचा विरोध केल्यामुळे खूप चर्चेत आली होती.

Visit : Policenama.com

You might also like