धक्कादायक ! भारतीय संरक्षण दलातील ९८ अधिकारी ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या कुरापती वाढत चालल्या आहेत. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने फेसबुकद्वारे सेजल कपूर नावाचे अकाऊंट बनवून भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कॉम्पुटर हॅक केले आहे. या हनीट्रॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारतातील अनेक अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

काही महिन्याआधी ब्राम्हमोस क्षेपणास्त्राचा इंजिनियर निशांत अग्रवाल याला नागपूरात अटक करण्यात आली होती. निशांतला आयएसआयने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे स्पष्ट झाले होते. सेजन कपूरने निशांतला हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्वाची माहिती मिळवल्याचे स्पष्ट होत आहे. आता हे हनी ट्रॅप प्रकरण मोठे असल्याचे समोर येत आहे.

सेजलने फक्त निशांतलाच नाही तर त्याच्या सारख्या सैन्यात असलेल्या इतर अधिकाऱ्यांना देखील जाळ्यात अडकवले होते. त्यात देशाचे सैन्यदल, वायूदल, नौदल, पँरामिलिट्रीबरोबरच महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांमधील 98 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सेजल कपूर ही पाकिस्तानी गुप्तहेर भारतातील अधिकाऱ्यांना तिचे आकर्षित करणारे फोटो व्हिडिओ पाठवून त्यांच्याशी मैत्री करायची, त्यानंतर चॅट करण्यासाठी ती अधिकाऱ्यांना कॉम्पुटरवर व्हिसपर आणि ग्रॅव्हिटी रॅट नावाचे अ्ॅप इंस्टाल करायला लावयची. परंतू हे दोन्ही अॅप मालवेअर होते. त्यांनतर हे अॅप डाऊनलोड करुन सेजल कपूर म्हणवून घेणारे आयएसआयचे गुप्तहेर भारतीय आधिकाऱ्यांच्या कंप्युटरमधील संपूर्ण माहिती चोरत.

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर मालवेअर वर येणाऱ्या कोडची सेजल आधिकाऱ्यांकडे विचारणा करायची. चॅट करण्यासाठी हा कोड गरजेच्या असल्याचे सेजल अधिकाऱ्यांना सांगायची. अधिकाऱ्यांकडून हा कोड घेऊन कंम्पुटरमधून सर्व कागद पत्रे, फाईल्स, फोटो आणि डेटा स्कॅन करुन घेतले जात. ऐवढेच नाही तर सेजल अधिकाऱ्यांकडून ती अनेक पासवर्ड देखील मिळवत असे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा