पाकिस्तानी PM च्या खुर्चीवर बसुन ‘या’ युवतीनं बनवला Tik Tok व्हिडिओ, बॅकग्राऊंडला ‘इंडियन’ बॉलिवूडचं गाणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये एक मुलगी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर बसलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंडला बॉलिवूड आणि पंजाबी गाणे वाजत असून या मुलीने टिकटॉकवर हा व्हिडीओ बनवला आहे.

हरीम शाह

या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव हरीम शाह असून ती टिकटॉक स्टार आहे. तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असून या व्हीडीमध्ये ती पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयामधील खुर्चीवर बसलेली दिसून येत आहे. याठिकाणी ती ज्या खुर्चीवर बसली आहे त्यावर पंतप्रधान इम्रान खान बसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय नेटकरी पाकिस्तान आणि पाकिस्तानी पंतप्रधानांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत असून या मुलीची थट्टा उडवली जात आहे.

हरीम शाह

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान मधील अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला असून हरिम हिने दिलेल्या माहितीनुसार, ती परवानगी घेऊन आतमध्ये गेली होती. त्याचबरोबर तिने पुढे म्हटले कि, मी पास घेऊन आतमध्ये गेले होते. त्याचबरोबर मी संसदेत देखील गेले होते. मला कुणीही तेथे अडवले नाही.
दरम्यान, याआधी देखील तिने अनेक पाकिस्तानी नेत्यांबरोबर व्हिडीओ काढले असून अनेक नेत्यांबरोबर ती दिसली आहे.

हरीम शाह

Visit : Policenama.com