‘लॉकडाऊन’मध्ये पाकिस्तानात प्रसारीत होणाऱ्या इस्लामी मालिकेत काम करणाऱ्या ‘तुर्की’ अभिनेत्रीला पाकिस्तानी युजर्सनं केलं प्रचंड ‘ट्रोल’ ! ‘हे’ आहे कारण

पोलिसनामा ऑनलाइन –भारतात लॉकडाऊनमध्ये रामाणय आणि महाभारत अशा पौराणिक मालिका सुरू आहेत. याचप्रमाणे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकांना धर्माचं ज्ञान देण्यासाठी तुर्कीची इस्लामी मालिका दिरिलिस अर्तुगरलचं उर्दू व्हर्जन अर्तुगरल गाजी हिचं पीटीव्ही वाहिनीवर प्रसारण सुरू केलं. पाकिस्तानात ही मालिका मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. परंतु याच मालिकेतील अभिनेत्रीला आता पाकचचे यजर्स ट्रोल करतााना दिसत आहेत.

अभनेत्री एसरा बिल्गिच (Esra Bilgic) हिनं या मालिकेत हलीमा सुल्तानची भूमिका साकारली आहे. एसरा आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एसरानं तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पाकमधील काही लोकांनी यावरच आक्षेप घेतला आहे. इस्लामच्या शिकवणीची आठवण करून देत तिला योग्य कपडे घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/B5VkhGInS0Y/

पाकच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आधीही कपड्यांमुळं ट्रोल झाल्या आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बोल्ड फोटो पोस्ट करताना कमेंट सेक्शनच हाईड करून ठेवतात. कारण अनेक युजर्स असे आहेत जे वाटेल तशा कमेंट करून त्यांना ट्रोल करत असतात.

https://www.instagram.com/p/BhCJ92iHfV0/

https://www.instagram.com/p/BB45z69Tbss/