पाकिस्तानकडून ‘व्हाट्सअप’द्वारे ‘हनीट्रॅप’, पुण्यातील तरुण अडकले ? ; लगेच चेक करा तुमचा ‘व्हाट्सअप’ ग्रुप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानला कितीही वेळा ध़डा शिकवला तरी तो काही सुधारायला तयार नाही. थेट रणभूमीवर डावपेच चालत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे भारतीय तरुणांना प्रलोभने दाखवत जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानी असतात. त्यामुळे तरुणांसाठी हनीट्रॅपही तयार केला आहे. याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तरुणांना आला आहे.

काय आहे प्रकार ?

येथील एका व्हाटस अप ग्रुपवर पाकिस्तानी युवकांनी आक्रमण केलं आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तानी तरुणांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट केले. तर अचानक येणाऱ्या अश्लील व्हिडीओंमुळे तरुणही भांबावून गेले. त्यानंतर काही जण यामुळे बाहेर पडू लागले. तर काही जणांनी शोध घेतला.

तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

या ग्रुप्सवर येणाऱ्या अश्लील व्हिडीओंचा शोध घेतल्यावर ते पाठविणाऱे क्रमांक हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले. तरुणांना युवती असल्याचं भासवून काही पाकिस्तानी क्रमांकांवरून अश्लील व्हिडीओ पाठविण्यात आले. तसेच त्यांना पाकिस्तानमधून व्हिडीओ कॉल येत आहेत. त्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर व्हाटस अप ग्रुपच्या इनव्हाईट लिंकच्या माध्यमातून पाकिस्तानी युवकांनी ग्रुपमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

हनी ट्रॅपचे प्रकार नवे नाहीत

भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानकडून हनी ट्रॅपचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरुण या ऑनलाईन हनी ट्रॅपचे बळी पडतात. तरुणांना पाकिस्तानने हनी ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे. लष्करी अधिकारीही काही वेळा याचे बळी पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे,

आरोग्य विषयक वृत्त – 

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?