पाकिस्तानी लोकांनी भारतीयांसह गायले वंदे मातरम, लंडनमध्ये चीनविरुद्ध निदर्शने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने भारताचे राष्ट्रीय गीत गाणे किती विरळ दृश्य असेल. मात्र रविवारी लंडनमध्ये असे होताना दिसले. चिनी दूतावासाबाहेर झालेल्या निषेधात काही पाकिस्तानी लोक भारतीयांसह भारताचे राष्ट्रगीत गाताना दिसले. चीनच्या विस्तारवादी धोरणांविरोधात भारतीय प्रवासी गटांद्वारे आंदोलन करण्यात आले होते. त्यात पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ आजकिया हे देखील सहभागी होते, जे आपल्या देशाबद्दल ‘कटू व नग्न सत्य’ बोलण्यावर विश्वास ठेवतात. त्यांनी भारतीयांसह मिळून ‘बॉयकॉट चीन’ आणि ‘चीन मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या.

पीओकेचे लोकही सहभागी
आजकिया म्हणाले, ‘आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी वंदे मातरम गायले.’ त्यांच्यासह अमजद अयूब मिर्झा हे देखील होते, जे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) मीरपूरचे आहेत आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पीओकेच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचार व अन्याया विरोधात खूप लढत आहेत. काही लोक कराचीचे होते आणि इराणमधील देखील बरेच लोक या निदर्शनात सहभागी झाले होते. हे सर्व चीनकडून त्यांच्या कामांमध्ये हस्तक्षेप झाल्याने त्रस्त आहेत.

जगातील अनेक भागात निदर्शने
मिर्झा म्हणाले, ‘मी यात भाग घेण्यासाठी ग्लासगोहून आलो आहे. मी पीओके येथून आहे. पाकिस्तानी ताब्यात राहणारा एक भारतीय आहे. चीन सीपीईसी (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) च्या माध्यमातून चिनी गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये कहर करत आहेत आणि पाकिस्तान सरकार त्यांच्याशी हातमिळवणी करत आहे.’ भारतीयांनी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याविरोधात पोस्टर आणि फलक लावले होते, ज्यामध्ये जिनपिंग यांनी आपल्या अत्यंत महत्वाकांक्षी सामर्थ्याच्या खेळावर नियंत्रण ठेवण्यासाबाबत लिहिले होते. प्रवासी भारतीयांनी असेच निदर्शन अमेरिका, कॅनडा आणि जगातील इतर भागातही केली.

लंडनमध्ये रस्त्यावर उतरले लोक
चीनबाबत वाढलेला रोष लंडनच्या रस्त्यावरही दिसू लागला. शनिवारी रात्री सेंट्रल लंडनमधील चिनी दूतावासाच्या इमारतीवर ‘फ्री तिबेट, फ्री हॉंगकॉंग, फ्री उइगर’ असे लिहिलेले चित्र दिसले. चीनने झिनजियांगमधील उइगर मुस्लिम अल्पसंख्याकांविरूद्ध मानवी हक्कांचे तीव्र उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेने चीन सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत. जगाने हाँगकाँगच्या लोकांविरुद्ध चीनच्या ‘क्रूर, व्यापक हल्ल्यांचा’ निषेध केला आहे.

चिनी उत्पादनांचा तीव्र बहिष्कार
महत्त्वाचे म्हणजे भारतीयांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतीय भागातील लडाखच्या गलवानमध्ये घुसखोरी व भारतीय सैनिकांना मारल्यानंतर चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या देशांनी ड्रॅगनच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. हे स्पष्ट आहे की, आता हळूहळू चीनच्या हुकूमशाही राजवटीविरूद्ध पडसाद उमटत आहेत.