पाकिस्तानमधील धोनीचा ‘हा’ चाहता धोनीमुळे पाहू शकणार सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामान होणार आहे. या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक उत्सुक आहेत. दोन्ही देशांतील पाठीराखे यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये येऊन पोहोचले आहेत. या सामन्याची तिकिटे देखील अवघ्या दोन दिवसांत विकली गेली. आता एका वेबसाईटवरून तिकिटांची काळ्या बाजाराप्रमाणे विक्री होत असून त्यांची किंमत १७ हजारांपासून ६० हजार रुपयांपर्यंत आहे.त्यामुळे प्रेक्षक आणि पाठीराखे हा सामना पाहण्यासाठी काहीही करू शकतात याचा प्रत्यय येत आहे.

मात्र या सगळ्यात भारतीय  खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा एक चाहता तिकीट मिळाले नसताना ६ हजार किलोमीटरचा प्रवास करून मॅंचेस्टरला पोहोचला आहे. त्याला विश्वास आहे कि, धोनी त्याच्यासाठी तिकीटाची व्यवस्था करेल. या चाहत्याचे  नाव आहे बशीर चाचा. बशीर चाचा हे मूळचे पाकिस्तानी असले  अमेरिकेत वास्तव्याला आहेत. ते भारत आणि पाकिस्तानचा प्रत्येक सामना दरवेळी न चुकवता पाहतात. २०११ च्या वर्ल्ड कपपासून भारत-पाक यांच्यातील सामना पाहण्यासाठी जातात. धोनी आणि बशीर चाचा यांची २०११ पासून ओळख आहे. २०११ च्या वर्ल्ड कपवेळी भारताचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते.

तेव्हापासून बशीर चाचा धोनीचे मोठे फॅन आहेत. २०११ मध्ये देखील धोनीने त्यांना सामन्याचे तिकीट दिले होते. दरम्यान,या सामन्याविषयी बोलताना बशीर चाचा म्हणाले कि, मी यथे आल्यापासून पाहत आहे कि, लोकं एका सामन्यासाठी ६० ते ७० हजार रुपये  मोजत आहेत. इतक्या पैश्यांमध्ये मी अमेरिकेला परत जाऊ शकतो. त्यामुळे आता धोनीने बशीर चाचांना तिकीट दिले तरी उद्या सामना होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्याविषयक वृत्त

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

नायरमधून पळविलेले ‘ते’ बाळ नर्सच्या सतर्कतेमुळे सापडले

त्याचा धडावेगळा झालेला हात, आता पुन्हा हालचाल करतोय