पाकिस्तानचा रडीचा डाव सुरुच, भारतावर नागरी वस्ती आडून ग्रेनेड हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याचा बदल्या घेण्यासाठी हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानात घूसून हल्ला केल्याने चिडलेल्या पाकिस्तानने आपला रडीचा डाव सुरुच ठेवला आहे. सीमेवर शस्त्र संधीचे उल्लंघन करून पाकिस्ताने काल सायंकाळपासून ग्रेनेड हल्ला करत आहे. या हल्ल्यात भारताचे पाच जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांना रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे.भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या पाच चौक्या उध्वस्त झाल्या आहेत.

https://twitter.com/ANI/status/1100544444363927553

भारताने काल पाकिस्तानात घूसून केलेल्या कारवाईनंतर सायंकाळी साडेसहानंतर पाकिस्तानने एलओसीवर १२ ते १५ वेळा शस्त्रस्ंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून भारतावर उखळी तोफा आणि मिसाईल यांच्या साह्याने ग्रेनेड हल्ला सुरु केला. त्याला भारतीय  लष्कराने प्रत्युत्तर दिले. परंतु पाकिस्तानकडून यापासून वाचण्यासाठी नागरी घरांचा आधार घेतला जात आहे. त्यामळे भारतीय जवानांकडून केवळ पाकिस्तानी चौक्यांवरच गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून नागरिकांचा ढालीसारखा वापर केला जात आहे. यात भारताचे पाच जवान जखमी झाले आहेत. तर त्यातील  दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

भारतीय जवानांनी वस्तीपासून दूर असलेल्या पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले आहे. भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानच्या पाच चौक्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.