हाफीज सईदला पुन्हा झटका ;  ‘जमात’च्या मुख्यालयावर कारवाई 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने ‘जमात-उल-दावा’ या संघटनेवर कारवाई केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे, मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफीज सईदची संघटना जमात-उल-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फौंडेशनच्या मुख्यालयाना पाकिस्तानमधील पंजाब सरकारने ताब्यात घेतले आहे.

नॅशनल ॲक्शन प्लॅनवर राष्ट्रीय सुरक्षा कमिटीच्या झालेल्या बैठकीनंतर पंजाब सरकारने ही कारवाई केली. या संघटनांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबरोबर सरकारने ‘जमात-उद-दावा’च्या मशिदी आणि मरशांवरही ताबा मिळवण्यसाठी ठोस पावले उचलली आहेत.

१८२  मदरशांवर नियंत्रण , १००  हून  अधिक लोक ताब्यात –
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वाढत चाललेल्या दबावामुळे पाकिस्तानला काही कारवाया करत असल्याचे दाखवणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानने काल १८२ मदरशांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. तसेच, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

हाफिज सईदला झटका-
संयुक्त राष्ट्राने २००८ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याचे प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे अपील काल फेटाळले आहे. भारताने हाफिजच्या हालचालीविषयी विस्तृत पुरावे आणि गोपनीय माहिती सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून हे वृत्त समोर आले आहे.

ह्याही बातम्या वाचा –

शिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले

#WomensDay : एअर इंडियाच्या विमानांची धुरा महिलांच्या हाती

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर : डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या

Loading...
You might also like