पाकिस्तानच्या तथाकथित धमक्यांमुळे भारताचा ‘संयम’ सुटला, दिला ‘हा’ गंभीर इशारा

उत्तराखंड वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिर मधील कलम ३७० हटवल्यानंतर भारतात आनंद आणि शांतता असली तरी शेजारील देश म्हणजे पाकिस्तान मात्र चांगलाच संतप्त झाल आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत भारताशी असलेले व्यवहार तोडले आहेत. तसंच समझोता एक्सप्रेसही बंद केली. त्यानंतर आता पाकिस्तानने थार एक्सप्रेसही बंद केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयांवर भारताने मात्र आता यावर प्रतिक्रिया देत पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे ठरवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारत ठणकून सांगितले की आपन करत असलेल्या गोष्टी बंद करा. पाकिस्तानने सत्य कबुल करावे आणि जगाच्या समोर काश्मिरबद्दल तुणतुण वाजवणे बंद करावे. काश्मिर हा भारताचा विषय आहे. या मुद्द्यावर अनेक देशांशी गप्पा झाल्या आहेत. तसंच संयुक्त राष्ट्रांनाही भारताची बाजू चांगलीच माहित आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले.

तसंच पाकिस्तानच्या एक्सप्रेस रोखण्याबाबत भारताने विरोध केला आहे. चर्चा केल्या शिवाय एक्सप्रेस रोखणे हे योग्य नाही. पाकिस्तानने यावर पुन्हा एकदा विचार करावा.

दरम्यान, गुरुवारी भारतीय सेनेनं LOC वर वाढलेल्या तनावामुळे अलर्ट जारी केला आहे. सेना प्रमुख बिपिन रावत यांनी या बद्दल सर्व माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली आहे. तसंच भारत पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.