PM नरेंद्र मोदींच्या ‘या’ इशार्‍यावर पाकिस्तानकडून जवानांवर ‘बेछुट’ गोळीबार, ‘NC’ च्या नेत्याचे वादग्रस्त वक्‍तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या मेंढरचे माजी आमदार जावेद राणा यांनी पंतप्रधान मोदींसंदर्भात एक विवादास्पद वक्तव्य केले आहे. कायमच आपल्या विवादित वक्तव्यांनी चर्चेत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जावेद राणा म्हणाले की पाकिस्तानची एवढीपण लायकी नाही की ते आपल्यावर गोळ्या चालवतील. मोदींच्या इशाऱ्यावर आपले लोक मारले जातात.

मोदी आणि भाजप मध्ये ‘ती’ ताकद नाही –

ते म्हणाले की पाकिस्तानातून मोदींच्या इशाऱ्यावर गोळीबार केला जातो. पुंछ मध्ये आयोजित पक्षाच्या एका बैठकीत संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी ते 35 A आणि 370 वर देखील विवादास्पद वक्तव्य केले. बैठकीत संबोधित करण्याआधी जावेद राणा हे असे देखील म्हणाले की मोदी आणि त्यांच्या पक्षात एवढी ताकद नाही की ते 35 A आणि 370 या कलमांना काढून टाकू शकतील.

ते पुढे असे देखील म्हणाले की, या मुद्यांवर त्यांनी आव्हान दिले आहे की, ते म्हणाले की, येथून पाकिस्तान 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. परंतू त्यांनी (जम्मू काश्मीरने) पाकिस्तानबरोबर न जाता दिल्ली बरोबर गेले, ते गोळ्या खाण्यासाठी नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले. परंतू आता मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावर तर यावरुन वादाला सुरुवात देखील झाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे

जाणून घ्या “योगा” कधी करावा

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

You might also like