‘बुर्ज खलिफा’ इमारतीवर पाकिस्तानचा ‘उलटा’ झेंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा झेंडा उलटा फडकविला गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत आणि पाकिस्तानचे झेंडे या इमारतीवर फडकविण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानचा झेंडा उलटा फडकाविण्यात आला. काही वेळातच इमारतीच्या व्यवस्थापनाला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तो दुरुस्त केला. पण तोपर्यंत उलटा झेंडा असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जगभरातील महत्वाच्या घटनांचे चित्र दिवसभर बुर्ज खलिफा च्या इमारतीवर प्रोजेक्ट केले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाकिस्तानचा झेंडा उलटा स्पष्टपणे दिसत आहे. झेंड्यावरील चांद हा वरच्या दिशेला असतो. या ठिकाणी तो खालच्या दिशेने दिसून येत आहे. त्यानंतर ही चुक सुधारण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like