Video : ‘पाकिस्तानच्या गोलंदाजांचे कागदावर वय 17-18, पण…,’ या दिग्गज खेळाडूनं केला गौप्यस्फोट

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कमरान अकमल याच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करताना ३८ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफनं पाकिस्तानी गोलंदाजांची पोलखोल केली. पाकिस्तानच्या गोलंदाजाचं कागदावर वय १७-१८ असते. मात्र त्यांचं खरं वय २७-१८ वर्ष असते, असा आरोप मोहम्मद आसिफनं केला आहे. आसिफच्या या आरोपांमुळे पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धार दिसत नाही. एकाही गोलंदाजाला कसोटी सामन्यात १० बळी घेता आले नाहीत. या नव्या दमाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणासाठीही उभे राहता येत नाही, इतकी त्यांची दमछाक होते, असे चित्र पाच सहा वर्षपासून दिसत आहे. आधीच्या गोलंदाजाप्रमाणे कसोटीत २० विकेट घेण्याची क्षमता पाकिस्तानी गोंलादाजीमध्ये दिसत नाही, अशी खंतही आसिफने व्यक्त केली.

पाकिस्तानी गोलंदाजाकडे पुरेसा अनुभव नसल्याने फलंदाजांना पुढच्या पायावर चेंडू कसा फेकायचा हे त्यांना माहित नाही. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना काय करावं? त्याचबरोबर धावा न देता यष्टीवर कशी गोलंदाजी करावी. जेव्हा ते यष्टीवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते डाव्या बाजूला जातात. सध्याच्या गोलंदाजाकडे नियंत्रणच नाही.

एक वेगवान गोलंदाज म्हणून न्यूझीलंडमधील उसळत्या खेळपट्यावर गोलंदाजी करताना आनंद व्हायचा. अशा खेळपट्टायवर पाच विकेट घेतल्यानंतरच मैदान सोडायचा विचार करायचो, असेही आसिफ म्हणाला.