‘या’ कारणामुळं 35 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर आली सनी देओलची पत्नी

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – सनी देओल याचा मुलगा आणि बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांचा नातू करण देओल पदार्पण करत असलेला चित्रपट ‘पल पल दिल के पास’ आज प्रदर्शित झाला. त्याआधी काल रात्री मुंबईत या चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक चित्रपट तारकांना तसेच अभिनेत्यांना पाहण्यात आले.
Pal Pal Dil ke Pass

महत्वाची गोष्ट म्हणजे सनी देओल याची पत्नी पूजा देओल ही देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होती. त्याची पत्नी कधीही माध्यमांसमोर आली नाही. मात्र मुलाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी तिला पाहण्यात आले. सनी आणि पूजा यांचे लग्न 1984 मध्ये झाले होते. त्यांना करण देओल आणि राजवीर देओल अशी दोन मुले आहेत. त्याचबरोबर धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यादेखील अनेक दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर दिसल्या. आपल्या नातवाच्या पहिल्या चित्रपटासाठी संपूर्ण घर एकाच छताखाली आले होते.
Sunny Deol

Pooja Deol

दरम्यान, आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल अनेक टेलिव्हिजन शोमध्ये देखील गेला होता. या चित्रपटात करण देओल मुख्य भूमिका साकारत असून सहर बाम्बा हिने मुख्य अभिनेत्री साकारली आहे.
Dharmendra

Prakash Kaur

Visit – policenama.com 

 

Loading...
You might also like