Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) देखील खूपच सुंदर दिसते. तिने अगदी कमी वयात स्वतःची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. पलक तिवारी सौंदर्य आणि बोल्डनेस मध्ये आईला देखील मागे टाकते. पलकला (Palak Tiwari) आज वेगळ्या अशा ओळखीची काही गरज नाही. तिने तिच्या स्टाईलने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

नेहमीच पलकचे ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.पलक देखील आईप्रमाणेच अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच पलकचे काही नवीन फोटोज इंस्टाग्राम वर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. पलक वेस्टन स्टाईल असो किंवा भारतीय स्टाईल ती तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना प्रभावित करत असते. पलकने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कॅज्युअल लुक मध्ये दिसत आहे. तिचे कॅज्युअल लूक बऱ्याच लोकांना आवडल्याचे दिसत आहे.

पलकच्या या कॅज्युअल लूकवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पलकने तिच्या कॅज्युअल लुक्सह न्यूड मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे. तर पलकच्या फोटोवर चाहते भरभरून कौतुक करत आहेत. पलकच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘रोजी’ या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title :- Palak Tiwari | palak tiwari shared new look in casual ware see her latest photos here