“अभिनंदन वर्धमान यांना परमवीर चक्र देण्यात यावा”

चेन्नई : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना “परमवीर चक्र’ हा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची मागणी होत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केली आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचे ‘एफ-16’ विमान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पळवून लावले. ते करताना अभिनंदन चालवत असलेले विमानही क्रॅश झाले. त्यात अभिनंदन हे बचावले मात्र ते पाकिस्तानच्या जमिनीवर पडले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यात होते.

पाकिस्तानमध्ये असताना त्यांनी त्यांची तत्परता दाखवत आपल्याकडील सर्व कागदपत्रांची विल्हेवाट लावली. पाकिस्तानने त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांनी काहीच माहिती दिली नाही. तसंच पाकिस्तानमध्ये त्यांनी कोणालाही न घाबरता भारताचा जय घोषही केला. पाकिस्तानच्या ताब्यात ते तब्बल ६० तास होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, अभिनंदन यांनी दाखवलेले शौर्य हे अतुलनीय आहे. पाकिस्तानला उत्तर देताना त्यांनी राष्ट्रहित हे एकच ध्येय समोर ठेवले. त्याचमुळे त्यांना लष्कराचा सर्वोच्च सन्मान अर्थात परमवीर चक्र देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी पलानीस्वामी यांनी पत्रात केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1103970430203777025 cm-tamil-nadu-e-

ह्याहि बातम्या वाचा –

हडपसर ते वाघोली चौपदरीकरणास मंजुरी

तारापूर अणुशक्ती केंद्रजवळ आढळल्या स्फोटकांनी भरलेल्या २ पिकअप व्हॅन

उड्डाणपूल, बाह्यवळण मार्गामुळे विकासाला चालना : नितीन गडकरी

आदिवासी विभागात 325 कोटींचा घोटाळा रोखल्याचा धनंजय मुंडेंचा दावा