Palghar ACB Trap | अवैध गुटखा वाहतूक सुरु ठेवण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची रेल्वेमार्गाने वाहतूक सुरु ठेवण्यासाठी प्रति महिना 10 हजार रुपये हप्ता म्हणून लाच घेणाऱ्या पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Palghar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. ठाणे एसीबीच्या पथकाने (Palghar ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.28) डहाणु रेल्वेस्थानकावर सायंकाळी पाचच्या सुमारास केली.

 

पोलीस नाईक अकील जमाल पठाण (वय- 32), पोलीस शिपाई समाधान शेषराव नरवाडे (वय 37) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 37 वर्षाच्या व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

 

यातील तक्रारदार यांना यांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतुक करताना यातील पठाण आणि नरवाडे यांनी पकडले होते. त्यामध्ये कारवाई न करण्यासाठी व यापुढे अवैध गुटखा रेल्वेमार्गाने वाहतुक करण्याचा धंदा चालु ठेवण्यासाठी परवानगी देण्यासाठी यातील दोघांनी तक्रारदार यांना दरमहा हप्ता म्हणुन 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे (Palghar ACB Trap) तक्रार केली.

त्यानुसार ठाणे युनिटने सोमवारी (दि.28) लाचेच्या मागणीची पडताळणी केली
असता दोन्ही आरोपींनी दहा हजार रुपये लाचेची एकत्रीत मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सायंकाळी पाचच्या सुमारास डहाणू रेल्वेस्थानक येथे सापळा रचण्यात आला.
अकील पठाण याला तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
लाच स्विकारल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास पोलीस हवालदार अमित चव्हाण,
विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दीपक सुमडा, नवनाथ भगत आणि
पोलीस नाईक सखाराम दोडे आणि स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Palghar ACB Trap | 2 policemen caught in anti-corruption net while accepting Rs 10,000 bribe to continue illegal Gutkha traffic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले