Advt.

Palghar Accident | एकवीरा देवीच्या दर्शनावरून परतताना ECO Car-कंटेनरमध्ये जोरात धडक; तिघांचा मृत्यु तर 9 जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – Palghar accident | एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. पालघर (Palghar accident) येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या झालेल्या भीषण अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर जवळपास 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करीत आहेत.

 

याबाबत माहिती अशी, इको कार आणि कंटेनरमध्ये जोरात धडक झाली आणि त्यामुळे मनोरजवळ हा भीषण अपघात (Palghar Accident) घडला आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून यामध्ये चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघात होताच याची माहिती तातडीने पोलिसांना (Police) देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

 

दरम्यान, हे लोक देवदर्शन करून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
या अपघातात तीन भाविक ठार झाले आहेत. मात्र, तब्बल 9 जण गंभीर जखमी आहेत.
त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Palghar Accident | eco car accident crash kills 3 injures 9 while returning from ekvira devi darshan marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा