पालघर जवळील तारापूर MIDC मध्ये ‘शक्तीशाली’ स्फोट, कंपनीच्या मालकासह 8 जणांचा मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑलनाइन – पालघरजवळ तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्पोठ इतका भीषण होता की त्यामुळे 15 किमीचा परिसर हादरला. एमआयडीसी मधल्या तारा नायट्रेट या एका केमिकल कंपनीत हा स्फोट झाला आहे. यामध्ये कंपनीच्या मालकासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचे अद्याप कारण समजू शकले नसून या स्फोटामुळे 2 ते 3 कंपन्यांना आग लागली आहे.

हा स्फोट कोलवडे गावाजवळील एमआयडीसीत झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, AIMS या इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीत शनिवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला असून या स्फोटामुळे कंपनीचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कंपनीत झालल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसरत हादरून गेला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्फोट इतका भयंकर होता की कंपनीचे छत उडून दूर फेकले गेले. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत अधिकारी नसल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. तसेच सात रुग्णवाहिकाही दाखल झाल्या. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/